बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

700 कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा दावा; किरीट सोमय्यांना केलं लक्ष घालण्याचं आवाहन

पुणे | मागील काही दिवस किरीट सोमय्या सतत महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत आहेत. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना पत्र लिहून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी या पत्रातून किरीट सोमय्यांना टोला लगावण्याची एकही संधी सोडलेली नाहीये.

भाजपची सत्ता असलेल्या “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 700 कोटींचा घोटाळा झाला असून तो घोटाळाही उघडकीस आणावा” असं राऊतांनी किरीट सोमय्यांना पत्रात म्हटलं आहे. याशिवाय “या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून यापूर्वीच्या सरकारमधील लोकांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी ईडी आणि सोमय्यांनी पुढाकार घ्यावा” असंही त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय त्यांनी सोमय्यांना उद्देशून “एकचं व्यक्ती भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडतेय, दुसरं काही महाराष्ट्रात होत नाही, भ्रष्टाचाराच्या विरोधात सगळ्यांनी लढाई केली पाहिजे, जे लढतात त्यांच्याकडे अजून काही प्रकरणं पाठवावीत, असं मला वाटतं. मी हे प्रकरण ईडीकडे देईन”, असा खोचक टोलाही लगावला आहे.

संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केलाय. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उभाळे यांच्यासह अन्य काही नगरसेविकांनी हा घोटाळा उघडकीस आणला असून या प्रकरणासाठी सोमय्या ईडीकडे पाठपुरावा करतील, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या-

इम्रान खानवर स्वत:च्याच देशात चोरी करण्याची आली वेळ?

भारताने लसीकरणात महत्त्वाचा टप्पा केला पार, जगभरात भारताचाच डंका

घटस्फोटानंतर समंथाची पुन्हा एकदा न्यायालयात धाव, कारण…

पीएफ कसा काढायचा? पीएफचे फायदे…यासह पीएफबद्दल सविस्तर माहितीसाठी ही बातमी वाचा

‘अमृता वहिनींना भाजपकडून आमदार व्हायचंय’, अमृता फडणवीसांना ‘त्या’ वक्तव्यावरून सडेतोड प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More