बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“किरीट सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड, ही कीड मी संपवणार”

मुंबई | गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांची (Central Investigation Agency) कारवाई होत असलेली पहायला मिळत आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही ईडीनं (ED) मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ माजवली आहे.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या (Kirit Sommaya) यांच्यावर INS Vikrant या मोहीमेखाली पैसे जमा करून 57 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. ते बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

किरीट सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. ही कीड मी संपवेल, अशा आक्रमक शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या यांनी विक्रांतच्या नावाखाली जमवलेला निधी हा आपल्या मुलाच्या कंपनीत गुंतवला आणि त्यांच्या निवडणुकीतही वापरला असल्याचा आरोप राऊत यांनी केला. या प्रकरणाची आयकर विभाग, ईडी, सीबीआयने चौकशी करावी अशीही मागणी राऊत यांनी केली.

थोडक्यात बातम्या – 

“खोटं बोल पण नेटानं बोल हा संजय राऊत यांचा स्वाभाव”

CNG गाड्या वापरणाऱ्यांना मोठा झटका, ‘ही’ महत्त्वाची बातमी आली समोर

कोरोनाच्या नव्या लक्षणाविषयी WHOचा गंभीर इशारा, म्हणाले…

Health| पोटात गॅस तयार झाल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय

गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More