मनोरंजन राजकारण

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण; “संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा”

मुंबई | सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयनं शिवसेना खासदार संजय राऊत अन् पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची चौकशी करावी, अशी मागणी बिजेपी प्रवक्ता निखिल आनंद यांनी केली आहे. या घटनेशी संबंधीत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळेस लगावला आहे.

निखिल आनंद यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटलं की, शिवसेनेनं सामनातून एक फडतूस लेख लिहीला होता. या लेखातून सुशांतचे चाहते, परिवार आणि बिहार पोलिसांचा अपमान करण्यात आला. एवढं मात्र निश्चित की शिवसेनेच्या नेते सीबीआयच्या चौकशीला घाबरून आहेत.

सीबीआयकडून संजय राऊत अन् आदित्य ठाकरे यांची चौकशी करत नार्को टेस्टही करण्यात यावी, अशी मागणी करतानाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही यामुळे अडचणीत आले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळेस केली आहे.

तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनीही याबाबत आपलं मौन सोडलं पाहीजे. महाराष्ट्र सरकार सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचं राजकारण करत असून पुरावे लपविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

वाढदिवसानिमित्त अभिनेत्री सहनूरने 30 हजार सॅनिटरी पॅडचं केलं वाटप

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती पुन्हा ईडी कार्यालयात दाखल

संजय राऊत…कधी येता कर्नाटकला?, मी मोकळाच आहे- नारायण राणे

“मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, हे संजय राऊतांचं म्हणणं हास्यास्पदच”

देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला दिले ‘हे’ तीन सल्ले, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या