बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊत आणि नवज्योतसिंग सिद्धू म्हणजे जुळे भाऊ”

मुंबई | पंजाब राजकारणात सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नवज्योतसिंग सिध्दू यांनी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब सरकारच्या 5 मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता पंजाबमध्ये राजकारण तापलेलं आहे. त्याचा परिणाम आता महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येत आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी नवज्योतसिगं सिद्धू यांच्यावर देखील टीका केली आहे. संजय राऊत आणि नवज्योतसिगं सिद्धू म्हणजे जुळे भाऊ, हे दोघं जातात तिथं सत्ता जाते, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

एकीकडे नवज्योतसिंग सिध्दू काँग्रेसला संपवत आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत शिवसेनेला बुडवत आहेत, अशा शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊत आणि नवज्योतसिंग सिध्दू यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यातच बरोबर त्यांनी मुंबई महापलिकेच्या कामावरून देखील मुंबई महापालिकेवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंमत करून कलानगर आणि मातोश्रीजवळ असलेल्या कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार का?, असा सवाल देखील नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“नेमका ‘हाच’ फरक आहे भाजप आणि काँग्रेसच्या विचारधारेतला”

‘उसूलो पर आंच आए तो टकराना जरुरी है’; राजीनाम्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंनी सोडलं मौन!

गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर

‘जर एखादं गटारातून बाहेर येत नाल्यात पडत असेल तर…’; कन्हैया कुमारच्या पक्षांतरावर भाजपची टीका

‘या’ गोष्टीमुळे गुगलचे मॅनेजर सुंदर पिचई दिवसभर असतात एनर्जेटीक, जाणून घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More