बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वाघाच्या मिशीला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहतोय मग बघू”

नाशिक | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करताना आमची दोस्ती वाघाशी होती. पिंजऱ्यातील वाघाशी नाही, असं वक्तव्य केलं होतं. याला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

वाघ हा वाघ असतो. त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहतोय मग बघू, असं म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.

सरकार काम करत असतं पण पक्ष संघटनेला गती मिळावी यासाठीही कार्यकर्ता स्तरावर काम करावं लागतं. कोरोना असला तरी राजकारण थांबत नाही. सत्ता मागच्या पानावरुन पुढे नेत असताना तुम्हाला संघटना बळकट करणं आणि संघटनेच्या तळागळातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी दौरे करावे लागतात. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मी दौरा करतोय, असं राऊतांनी सांगितलं.

दरम्यान, 5 वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचाच राहिल. तशी कमिटमेंटच सुरूवातीला दिली गेली आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“गुलामासारखी वागणूक मिळत होती तर तेव्हा तुमचं तोंड शिवलं होतं का?”

‘शिवबांचे खरे वैचारिक वारसदार असाल तर…’; आरक्षणासाठी नक्षलवाद्यांनी काढलेल्या पत्रकाला संभाजीराजेंचं उत्तर

‘तिचे माझ्या बहिणीच्या नवऱ्यासोबत संबंध होते’; राज कुंद्राचा खळबळजनक खुलासा

“आम्ही कोरोनाने मेलो तरी हरकत नाही, मुलांना लस मिळायला हवी होती”

भाजपला मोठा धक्का!; एकाचवेळी 15 नेत्यांचा पक्षाला रामराम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More