बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची”

नाशिक | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलं आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं.

नरेंद्र मोदी हे भाजप आणि देशाचे मोठे नेते आहेत. जे यश भाजपला प्राप्त झालं आहे ते त्यांच्या चेहऱ्यामुळेच आहे. पण पंतप्रधान हे देशाचे असतात, त्यांनी राजकीय प्रचार करु नये. कोणत्याही पक्षाचा प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान आहेत. फोटो वापरणे हे कार्यकर्त्यांवर असतं. बाळासाहेबांचा फोटो वापरला जातो, वाजपेयींचा वापरा जात होता. हे असं ठरवून होत नाही, लोकांच्या मनात तो नेता असतो, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा देखील संजय राऊत यांनी यावेळी दिल्या.

थोडक्यात बातम्या- 

भारताचे माजी बॉक्सिंगपटू दिनको सिंह यांचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन!

“सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये येतील, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय”

“…त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली असती”

‘नवनीत राणा यांच्यावर लोकसभा सभापतींनी कारवाई करावी’; आनंदराव अडसूळ आक्रमक

नियती काळ बनून आली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा करुण अंत, मालाड दुर्घटनेनं मुंबईच्या डोळ्यात पाणी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More