Devendra Fadnavis | शरद पवारांच्या (Sharad Pawar) डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) चेहरा नक्कीच नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते. यावरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
राऊतांची फडणवीसांवर टीका
शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय ते जर त्यांना कळलं असतं तर त्यांची आज अशी अवस्था झाली नसती. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का? त्यांना हे कोणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
2019 साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीस यांना कळलं नव्हतं. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच ना. आता 2024 साली तुमच्यात हिंमत असेल तर वेळेत निवडणुका घ्या, मग डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर हे समजेल तेव्हा फडणवीस यांचा मेंदू काम करायचा बंद होईल, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
संजय राऊतांची अमित शहांवर टीका
संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री असल्याने त्यांना मुंबईत येण्याची परवानगीची गरज नाही, असं ते म्हणालेत.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येतायेत, येऊद्यात. पण मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग, अनेक संस्था त्यांनी गुजरातला पळवल्या त्याप्रमाणे ते एक दिवस लालबागचा राजा गुजरातला नेणार नाहीत ना… हेही होऊ शकतं. शाह काहीही करू शकतात, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
गणपती बाप्पाला ‘या’ राशीचे लोक फार प्रिय असतात!
आयफोन 16 ‘या’ देशात मिळणार सर्वात स्वस्त!
घरी गणपती बाप्पाची स्थापना करत असाल तर ‘या’ वस्तू घरात चुकूनही आणू नका!
गणेशोत्सवाला गालबोट! मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोघांना BMW कारने चिरडलं
पुण्यातील ‘या’ भागात 10 दिवस दारू बंदी!…तर असं केल्यास कारवाई होणार