“राज ठाकरेंवर उपचार करण्याची गरज, एखाद्या चांगल्या काऊन्सिलरकडे त्यांनी दाखवावं”
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातल्या गणेश कला क्रीडा रंगमंदिरात भव्य सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. या टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंवर उपचार करण्याची गरज आहे. एखाद्या चांगल्या काऊन्सिलरकडे त्यांनी दाखवावं. माणसाला एकदा निराशेने ग्रासलं की तो काहीही बोलतो. मुळात हिंदुत्वाशी त्यांचा संबंध आलाय का तर अजिबात नाही, असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
राज ठाकरे यांनी सोयीनुसार हिंदुत्वाची भूमिका घेतली. इतर कोणतीही दुकाने चालली नाहीत म्हणून त्यांनी हिंदुत्वाचं दुकान चालवून बघावं म्हणत हे दुकान सुरु केलं. तेव्हा काही दिवसांपासून ते हिंदुत्वावर बोलतायत. पण अयोध्या राम मंदिर वगैरे वगैरे यावर बोलताना आपला इतिहास त्यांनी तपासून बघावा, असंही संजय राऊत म्हणाले.
आपल्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधापाठीमागची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली. माझ्या अयोध्या दौऱ्याविषयी ट्रॅप रचला गेला. महाराष्ट्रात आणि दिल्लीत त्याचं प्लॅनिंग झालं, असे अनेक गंभीर आरोप राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला’; दीपाली सय्यद यांची पुन्हा राज ठाकरेंवर टीका
“पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊदसोबत संबंध नाहीत ना?”
‘…म्हणून अयोध्या दौरा स्थगित केला’; राज ठाकरेंनी सांगितलं कारण
‘मी काय कांड करणार?, मला कांड करायचा असता तर…’; सभेआधी वसंत मोरे संतापले
“आता सुरू केलं आहे ना एकदाचा तुकडा पाडून टाका”
Comments are closed.