महाराष्ट्र मुंबई

‘नया है वह’ म्हणत फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका, संजय राऊतांचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई | ‘नया है वह’ असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यालाच शिवसेना नेते संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नरेंद्र मोदी-अमित शहा हे दिल्लीत, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात नवेच आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना उत्तर दिलंय. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

देवेंद्र फडणवीसही नवेच आहेत, ते जुने कुठे झाले आहेत. तरुणांना संधी द्यावी, या मताचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही आहेत. अमित शाहसुद्धा दिल्लीच्या राजकारणात नवीनच आहेत. मात्र त्यांनी गृहमंत्री म्हणून दिल्लीत उत्तम काम केलं आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलंय.

मोदीही दिल्लीत नवे होते, त्यांनी उत्तम काम केलं, आम्ही कौतुक करतोच की. त्यांना आम्ही नया है वह म्हटलं का? आदित्य ठाकरे हे मंत्री म्हणून चांगलं काम करत आहेत, अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

नया है वह! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवत आहेत. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतंच, असं नाही. त्यामुळे ठिक आहे, अशी टीका फडणवीसांनी केली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

हट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणतात… ‘जंगजौहर’चा रक्त सळसळ करायला लावणारा टीझर

ऐश्वर्याला कोरोना झाला हे कळताच विवेक ओबेरॉयचं ट्विट, म्हणतो…

महत्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी, बघू ते मुलाखत देतात का?- संजय राऊत

धक्कादायक! भाजप मंत्र्याच्या मुलाला रोखल्यामुळे पोलिस महिलेला द्यावा लागला राजीनामा

गेहलोत यांचा 102 आमदारांचा दावा चुकीचा, 25 आमदार तर इथे माझ्यासोबत बसलेत- सचिन पायलट

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या