Top News पुणे राजकारण

संजय राऊतांकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, म्हणाले….

पुणे | पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता आहे. शिवाय फडणवीस राज्याचे नेते असून आम्ही कायम त्यांचा सन्मान केलाय.

कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलं नाहीये. ध्यानीमनी नसताना फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. मात्र तो धक्का अजूनही ते पचवू शकलेले नाहीत. त्यातून बाहेर पडून त्यांनी पुढील राजकारण केलं पाहिजे, असा सल्लाही राऊत यांनी दिलाय.

राऊत पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चांगला संवाद आहे असं मला वाटतं. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये चांगला संवाद असायला हवा. पण अनेकदा ही श्रृंखला तुटताना दिसत आहे.”

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांवर 12 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, राज्यपालांकडे चौकशीची मागणी

विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेला होकार!

‘मी 3 वर्षांची असताना….’; अभिनेत्री फातिमा सना शेखचा खळबळजनक गौप्यस्फोट

“भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही”

“कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणं महाराष्ट्राला शोभत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या