बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इनफ इज इनफ, हिंदूंना वाचवण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत”

मुंबई | मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर अत्याचार सुरू आहे. यावर आता संजय राउत यांनी संतप्त होऊन मोंदीना लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय बांगलादेशी हिंदूना वाचवण्यासाठी सरकारने तातडीने पाउले उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ज्या भारताने जगाच्या नकाशात बांगलादेश नावाच्या राष्ट्राला नवीन स्थान मिळवून दिलं. त्याच बांगलादेशातील मुस्लिमांनी हिंदूवर हल्ले चढवावेत. हिंदूंची हत्याकांडे घढवून भारताच्या उपकाराचे असे पांग फेडावेत. हे संतापजनक आहे. इनफ इस इनफ, अशा शब्दात संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय.

ज्या भारताने बांगलादेशाची पाकिस्तानच्या राक्षसी अत्याचारातून सुटका केली. पूर्व पाकिस्तान नाव बदलून ज्या देशाला बांगलादेश नावाचं बाळ जन्माला घातलं. त्याच बांगलादेशाने भारताच्या उपकाराचे असे पांग फेडावेत?, असा सवाल करत त्यांनी बांगलादेशवर रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान, दुर्गापुजा सुरू झाल्यापासून बांगलादेशमधील हिंदू नागरिकांवर अत्याचार सुरु आहेत. हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. हिंदू नागिरांच्या घरात घुसून घरांची तोडफोड केल्याच्या अनेक घटना मागील काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. आत्तापर्यंत 20 हिंदूचे मृतदेह सापडले असून इतर मृतदेहांचा तपास सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; दिवाळीपूर्वी मिळणार बोनस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार

“पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खरंतर कोणतीही वाढ झालेली नाही”

देशसेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल- समीर वानखेडे

महाराष्ट्र हादरला! एकाच जिल्ह्यात दोन दिवसात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More