बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चौकशी सुरू असताना क्लिन चीटचं कमळ कसं उगवलं ?”

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार योजना सुरू झाली होती. या जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला आहे, अशा प्रकारचे आरोप विरोधकांरकडून करण्यात येत आहेत. त्यातच आता जलयुक्त शिवार योजनेच्या भ्रष्टाचारावरून भाजपला क्लिन चिट मिळाली आहे. यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

जलयुक्त शिवाराची स्वतंत्र चौकशी एसआयटी,लाचलुपचत विभागाकडून सुरू आहे. चौकशी सुरू असताना अचानक निर्दोष क्लिन चिटचं कमळ कसं उगवलं, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा आहे. जलयुक्त शिवाराबाबतची क्लिन चिट म्हणजे कोणीतरी कारस्थान करतयं,  असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आमच्यावर दोषी म्हणून चिखल उडवायचा आणि स्वत:कडं आलं तर निर्दोष. हा पोरखेळ बंद व्हायला पाहिजे. जलयुक्त शिवाराचे आरोप शेकडो कोटींचे आहेत. हे आरोप पाहिल्यावर मला बिहारमधल्या चारा घोटाळ्याची आठवण झाली. अनेक जिल्ह्यात चारा घोटाळा झाल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. तसेच जलयुक्त शिवारात अनेक जिल्हे आणि तालुक्यामध्ये अनेक डबकी तयार झाली आहेत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील डबक्यांमधून किती पाणी जिरलं आणि कोणी जिरवलं याचा तपास सुरू आहे. आमच्या बत्तीशीला कोणी चॅलेंज देऊ नये, असं म्हणतं संजय राऊत यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘शेतकऱ्यांना लुटल्यावर हातपाय जोडणार नाही, तर थेट…’; वरूण गांधी आक्रमक

ऐकावं ते नवलंच! ‘या’ देशात पहिल्यांदाच आढळला कोरोना रूग्ण

काँग्रेसचा भाजपला दे धक्का! विद्यमान नगराध्यक्षासह ‘या’ नेत्यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश

अफगाणिस्तानात भयावह परिस्थिती! पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या पोरीला विकलं

शाहरूखच्या पदरी निराशा! ‘या’ कारणामुळे आर्यनची आजची रात्र देखील तुरूंगातच

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More