बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊत यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

मुंबई | दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार देण्यात येतो. वर्ष 2020 साठीचे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार शनिवारी दीनानाथ मंगेशकर यांच्या 79व्या स्मृतीदिनी जाहीर करण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो.

सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ संगीतकार मीना खडिकर, ज्येष्ठ गायिका-संगीतकार उषा मंगेशकर यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येतो. वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा तर अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, प्रेम चोपडा, नाना पाटेकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

दरम्यान, कोरोनामुळे हा कार्यक्रम होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. या पुरस्कारासोबत एक लाख 11 हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आजारातून बरा झाल्यावर एक झाड लाव’; सोशल मीडियावर डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तुफान व्हायरल

अनिल देशमुख यांच्यावर धाड, ‘दया कुछ तो गडबड हैं’ म्हणत राऊतांकडून शंकेची वावटळ!

“उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, पण सीबीआयने धाडच टाकली”

आठवड्याभरातच कोरोनामुक्त झाला सोनू सूद, कंगणा म्हणाली…

‘रोज उठून त्यांचं नाटक चाललंय’; चंद्रकांत पाटील संजय राऊतांवर भडकले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More