अजितदादांची गरज संपली, भाजपकडून आता काटा काढण्याचा प्लॅन?; राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut | लोकसभेनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वांना आता विधानसभेचे वेध लागले आहे. महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागली आहे. मात्र, त्यापूर्वीच महायुतीमधील अंतर्गत कलह आता समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी आणि जागा वाटपवरून महायुतीमधील संघर्ष चव्हाट्यावर आल्याचं दिसून येतंय.(Sanjay Raut)

राजकीय वर्तुळात तर जागावाटपापूर्वीच अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याची देखील जोरदार चर्चा आहे. या सर्व चर्चेबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी थेट मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणुकीपूर्वीच अजितदादा आणि शिंदे यांचा भाजप काटा काढेल, असं राऊत म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

अजित पवार यांचा काटा काढण्याचा कार्यक्रम भाजपने सुरु केला आहे. त्यामध्ये मिंधे गटाचे काही नेते सामील आहेत. अजित पवार यांना बाहेर काढलं तर जास्त जागा लढवता येतील, हे यामागील राजकारण आहे. अजितदादा काकांशी बेईमानी करुन आणि इतका मोठा धोका पत्कारुन भाजपसोबत आले. पण आता त्यांची गरज संपलीये. त्यामुळे अजितदादा यांना अडचणीत आणणारी वक्तव्यं आणि भूमिका भाजप व शिंदे गटाकडून केली जातेय, असा थेट आरोपच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

शिंदे यांच्याकडे महाराष्ट्राचं नेतृत्व राहू नये, म्हणून..

पुढे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील मोठं विधान केलं. भविष्यात शिंदे यांच्याकडे राज्याचं नेतृत्व राहू नये, म्हणून भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत हालचाली सुरु केल्या आहेत. शिंदे यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीचा सर्व खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. झारखंड आणि हरियाणाच्या निवडणुकीचा खर्चही एकनाथ शिंदे यांच्याकडून करुन घेतला जात असल्याचा दावाच संजय राऊत यांनी केला आहे.

“एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हे याच पैशांवर टिकून असून त्यासाठी राज्यात लुटमार सुरु आहे. एकनाथ शिंदे यांना हजारो कोटी रुपये गोळा करुन त्या थैल्या दिल्लीतील गुजराती व्यापारी मंडळाला द्याव्या लागतात.”, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे.

News Title-  Sanjay Raut  big claim about Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या-

घराबाहेर आल्यावर अरबाजने निक्कीसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाला…

नवरात्रीत शनि नक्षत्र बदलणार, ‘या’ 3 राशींचं भाग्य उजळणार

बंगळुरूतील घटनेनं देशभर खळबळ, फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे 30 तुकडे

मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीराजे घेणार भेट

“आमचं चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होण्याची गॅरंटी”