मुख्यमंत्री पदाबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य!

Sanjay Raut | राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला आपली जागा दाखवून दिली. महाविकास आघाडीने एकूण 30 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे महायुतीने केवळ राज्यात 17 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे आता आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीच विजयी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याबाबत वक्तव्य केलं आहे.

महाविकास आघाडीला मिळालेलं यश हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामुळेच मिळालं असा दावा आता उद्धव ठाकरेंनी केला आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढणं हे धोकादायक असल्याचं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.

आगामी विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा डोळ्यासमोर समोर न ठेवता निवडणूक लढवणार असल्याचं ठरलं होतं. पण महाविकास आघाडीने एकत्रितपणे घेतलेल्या निर्णयाच्या विपरीत वक्तव्य हे संजय राऊत यांनी केलं. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, अशी अप्रत्यक्ष मागणी  संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्रानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान हे उद्धव ठाकरेंकडे पाहून झालेलं आहे.

अर्थातच तिघांचीही ताकद तेवढीच महत्त्वाची होती. मात्र बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही. लोकं स्विकारणार नाही. लोकांना चेहरा द्यावाच लागणार आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान संजय राऊत हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. याआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर न आणता विधानभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचं अप्रत्यक्षरित्या नाव मुख्यमंत्री पादासाठी नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे.

News Title – Sanjay Raut Big Statement on Uddhav Thackeray About Future Cm Of Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

…तर टीम इंडिया 16 महिन्यानंतर इंग्लंडचा वचपा काढणार?

पुणेकरांनो ‘या’ गोष्टी करताना शंभर वेळा विचार करा; पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये

देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांना दिल्या ‘या’ महत्वपूर्ण सूचना

लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; तात्काळ रुग्णालयात केलं दाखल

या राशीच्या व्यक्तींना उत्पन्नाची नवीन संधी मिळेल!