Top News विधानसभा निवडणूक 2019

..म्हणून पत्रकारांनी संजय राऊतांच्या केकवर लिहिलं; “सर फोन उचला की ओ!”

मुंबई |  शिवसेनेचे रणझुंजार नेते संजय राऊत यांचा आज वाढदिवस. आज राऊत 59 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मुळचा पत्रकारितेचा पिंड असलेल्या राऊतांचा वाढदिवस आज त्यांनी ज्याठिकाणी पत्रकार परिषद घेतली त्याच ठिकाणी विविध वृत्तवाहिन्यांच्या आणि वृत्तपत्रांच्या पत्रकारांनी साजरा केला. परंतू पत्रकारांनी त्यांच्या केकवर एक विनंती लिहिली होती आणि ती विनंती होती सर फोन उचला की ओ….!

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यापासून संजय राऊत राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. सत्तासंघर्षाच्या पेचात शिवसेनेकडून थेटपणे कुणी बोलत नाही पण संजय राऊत यांची नित्यनियमाने भाजपविरोधात तोफ धडाडते आहे.

पत्रकारांनी संजय राऊत यांना दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. तसंच राऊतांनी देखील त्या मोठ्या मनाने स्विकारल्या. काही वेळ त्यांनी पत्रकारांशी भरभरून गप्पा मारल्या. अन् त्यांची फोन उचलण्याची विनंती देखील मान्य केली.

दरम्यान, संजय राऊतांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या