Top News विधानसभा निवडणूक 2019

भाजपशी ‘सामना’ करणाऱ्या शिवसेनेचे झुंजार नेते संजय राऊतांचा आज वाढदिवस

मुंबई | हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज झाले परंतू राज्यातला सत्तासंघर्ष शिगेला होता. अशा परिस्थितीत रूग्णालयाच्या बेडवर उपचार घेत असताना शिवसेना नेते संजय राऊतांनी ज्या पद्धतीने पक्षाची बाजू लावून धरली त्यांचं सगळ्यांनीच कौतूक केलं. त्याच शिवसेनेच्या रणझुंजार नेत्याचा आज वाढदिवस आहे.

संजय राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 साली झाला. आज संजय राऊत 59 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. करिअरची सुरूवात त्यांनी पत्रकारितेतून केली. त्यांच्या क्राईम रिपोर्टनी मुंबईच्या अंगावर अक्षरश: शहारे आणले.

नंतर राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी मग मागे वळून पाहिलंच नाही. तरूण वयातच सामनाचे संपादक… शिवसेनेचा प्रभावी नेता… राज्यसभा सदस्य असा चढत्या क्रमाने त्यांचा आलेख राहिला.

दरम्यान, संजय राऊतांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर त्यांना शुभेच्छा दिल्याच आहेत पण विशेष म्हणजे भाजपशी ‘सामना’ केल्यानंतरही भाजप नेत्यांनी त्यांच्यावर विशेष प्रेम दाखवलं आहे.

काँग्रेस शिवसेनेचं नातं किती जुनं आहे ते पाहा…!

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या