बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात”

मुंबई | राज्यातील राजकरणात अलीकडे अनेक घटना घडताना दिसत आहेत. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत रोकठोकपणे भाष्य करताना दिसतात. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे.

शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करण्याबाबत संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत अनेक नेत्यांनी संजय राऊतांवर टीका केली. यादरम्यान पंढरपूर-मंगळवेढाच्या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा अर्ज भरण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत पाटील यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांचा जोरदार समाचार घेतला आहे.

संबंधित प्रकरणाबाबत आपण उत्तर देणं बरोबर नसून संजय राऊत हे चंद्रावर, सुर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर मी एक सामान्य माणूस आहे आणि त्यांनी काय म्हटलंय यावर आपण प्रतिक्रीया देणं बरोबर नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना नांदेडमधील पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावर देखील भाष्य केलं. आम्ही पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन कधीच करणार नाही. मात्र हा असंतोष तेथील नागरिकांमध्ये का निर्माण झाला?, याचा विचार ठाकरे सरकारने करावा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनाचं संक्रमण वुहानच्या प्रयोगशाळेतून नव्हे तर…’; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक दावा

शितल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यास सायबर तज्ज्ञांना अपयश; आत्महत्येमागचं गुढ कायम

संजय राऊत मोठे नेते, सरकार स्थापनेत त्यांचं योगदान आहे पण…- बाळासाहेब थोरात

धाडसी अंगरक्षकाने पोलीस अधीक्षकांवर होणारा तलवारीचा वार अंगावर झेलला!

“पवार साहेब, शेतकरी विरोधात काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवा, वेळ मिळाल्यास आमच्याकडेही लक्ष द्या”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More