बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊत कुठल्याही क्षणी राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात”

मुंबई | सर्वप्रथम संजय राऊत (Sanjay Raut) यांचं शपथ पत्र घ्या. कारण संजय राऊत पवार यांच्या कुशीत जाऊन बसलेले आहेत. ते कधीही राष्ट्रवादीत सदस्यत्व घेतील. त्यामुळे आधी काळजी घ्या, असा इशारा भाजप नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेला माध्यामांशी बोलताना दिला.

एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेकडून खबरदारीची पाऊल उचलली जात आहेत. यातच शिवसेनेने आमदारांना शपथ पत्र देण्यास सांगितलं आहे. या पत्रात शिवसैनिकांंकडून एकनिष्ठतेच्या प्रतिज्ञापत्राची मागणी करण्यात आली आहे. यासाठी शिवसेनेकडून स्वाक्षरी मोहिम राबवण्यात येत आहे.

आम्ही पक्षासी एकनिष्ठा आहोत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. त्यांना आमचा बिनशर्त पाठिंबा आहे, असा काहीसा मजकूर या प्रतिज्ञापत्रात आहे.

या प्रतिज्ञापत्रावर अनेकांनी टीका केली आहे. दरेकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण आलं आहे. यावर संजय राऊत आता काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

“…तर आता मोठ्या मनाची ढाल समोर करण्याची वेळ भाजपवर आली नसती”

शिवसेनेचे एवढे खासदार फुटण्याची शक्यता, मोठी माहिती आली समोर…

‘राज्यसभा निवडणुकीत मी पराभूत झालो असतो तर…’; राऊतांचं मोठं वक्तव्य

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; ‘या’ आमदाराला संधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More