महाराष्ट्र मुंबई

वांद्रेची घटना सरकारला अडचणीत आणण्यासाठी घडवली गेली- संजय राऊत

मुंबई | मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकावर हजारो कामगारांनी गर्दी केली होती. या घटनेवरून राजकीय वातावरणही चांगलं तापलं होतं. या घटनेसंदर्भात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.

वांद्रयाची घटना ही ठरवून झालेली होती. वांद्रेतील घटना राज्य सरकारला अडचणी आणण्यासाठी घडवून आणली गेली, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

साधूच्या वेशातून जिहादी फिरताहेत असे मेसेज पसरवणारे कोण होते, ते आज पालघरच्या घटनेविषयी आकांडतांडव करत आहेत. त्यांना या घटनेचं दुःख कमी आहे. त्यांचं दुःख इतकंच आहे की, दुर्दैवानं दोन साधुंची हत्या होऊनही या महाराष्ट्रात दोन धर्मात तेढ निर्माण झाला नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांना पाच वर्ष राज्याचा कारभार करण्याचा उत्तम अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला मिळवून दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना सहकार्य केलं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे

लॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

दिलासादायक! गेल्या 14 दिवसात 78 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी राहीबाई पोपेरे यांचा मोलाचा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या