Sanjay Raut | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास अवघे काही तास बाकी असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार पडले तेव्हा 50 खोके हा मुद्दा चांगलाच गाजला होता. राऊत यांनीच सर्वप्रथम 50 खोक्यांचा उच्चार केला होता.आता विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut)
संजय राऊत यांनी भाजप व महायुतीवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस जे उशाशी नोटांचे बंडल घेऊन झोपतात, ते गादीमध्येही पैसे टाकून झोपतात. त्यांनी अपक्षांना 50 कोटी, 100 कोटीची ऑफर द्यायला देखील सुरुवात केली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी राऊत यांनी हा दावा केलाय.
अपक्षांना 50 ते 100 कोटींची ऑफर?
त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर त्यांनी लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना पैशांच्या थैल्या पाठवल्या नसत्या, असंही राऊत म्हणाले आहेत. दोन चार टक्क्यांच्या आधारावर भाजपाच्या जागा कशा वाढतात?,कुठे चार टक्के वाढतात तर हरियाणात सहा टक्के वाढ, निवडणूक आयोगाने मार्गदर्शन करावं. याबाबत महाराष्ट्राला सांगावं, असंही ते म्हणाले.
यावेळी राऊत यांनी सत्ता स्थापनेबाबतही भाष्य केलं. “लोकसभेला महाविकास आघाडीला 10 जागाही मिळणार नाही, असं म्हटलं जात होतं, पण आम्हाला 31 जागा मिळाल्या. सर्वेची ऐशी की तैशी. आम्ही काल एकत्र बसलो. महाराष्ट्रातील मतदान आणि मतदारांचा कौल यासंदर्भात आमची चर्चा झाली. 160 जागा आम्ही सहज जिंकतोय. हे सर्वे कोणी आणि कसे केले. कसले हे एक्झिट पोल? आम्ही 26 तारखेला सरकार बनवतोय. एक्झिट पोल्सवर आमचा विश्वास नाही.” असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.
26 तारखेला आम्ही सरकार बनवणार- राऊत
“सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर तिथे लहान पक्ष आणि अपक्ष येतात. पण आमच्याबरोबर शेतकरी, कामगार वर्गाचे नेते, समाजवादी, डावे पक्षाचे आमदार येतील. अपक्ष उमेदवारांनीही पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली आहे”, असंही ते म्हणाले आहेत. राऊत यांच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. (Sanjay Raut)
News Title – Sanjay Raut claim that bjp offer 50 crore to independent candidates
महत्त्वाच्या बातम्या-
विधानसभा निवडणुकीत विजयाची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांची यादी आली समोर!
कॉँग्रेसच्या तब्बल ‘इतक्या’ जागा येणार?, नाना पटोलेंनी CM पदाबाबतही केला मोठा दावा
‘बटेंगे तो कटेंगे’वर होणार कारवाई?
अजित पवार ‘या’ तारखेला CM पदाची शपथ घेणार; बड्या नेत्याचा दावा
सोन्याचा दरवाढीला कौल, दोनच दिवसांत झाली ‘इतक्या’ हजारांची वाढ; पाहा आजच्या किंमती