बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणी त्यांची पक्षनेते पदावरुन हाकलपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परीपत्रक जारी करत ही कारवाई केली. शिवसेना पक्ष संपवण्याच्या हेतूने ईडी नावाची तलवार शिवसेनेच्या आमदारांच्या मानेवर ठेवल्याने त्यांनी बंड केलं, असा दावा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.

मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती. मात्र, मी बाळासाहेबांना मानतो म्हणून गेलो नाही, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. शिंदे गटाकडून फसवणूक केली जात आहे. लोकांना फसवणं ही भाजपची पद्धत आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेले लोकही भाजपसारखेच वागत असल्याचं राऊत म्हणालेत.

संजय राऊत म्हणाले, भाजपचा मुंबई महानगरपालिकेवर डोळा आहे. त्यांना सेनेची मुंबईतील ताकद कमी करायची आहे. त्यामुळे ते शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चालवत आहेत. तसेच माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता, मात्र मी ईडी चौकशीला सामोरे गेलो. सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याचं कारण नाही. मी बॅग भरून आलो आहे, असं ईडी अधिकाऱ्यांना सांगितल्याचं राऊत म्हणालेत.

संजय राऊत यांची ईडी कडून 10 तास चौकशी चालली. यावेळी त्यांचा जबाबही नोंदविण्यात आला. गोरेगाव येथील पत्राचाळीच्या 1 हजार 39 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी करण्यात आली.

थोडक्यात बातम्या – 

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; ‘या’ आमदाराला संधी

छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव यांची निवड

बंडखोर आमदार राहिलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं एकूण बिल किती?; आकडा वाचून धक्का बसेल

ईडीच्या चौकशीची पिडा टळली; उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी समोर

“शासकीय पूजेनंतर महिन्याभरात शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More