बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मजूरांसाठी रेल्वे गाड्या सोडायला तयार नाही, राज्य सरकारने खाजगी वाहनांना परवानगी द्यावी”

मुंबई |  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे. कामगारवर्गाचे खाण्याचे हाल सुरू असल्याने झोपडीत मरायचं ते चालून मेलो तरी बेहत्तर पण गावाकडे जाऊया, असा निर्धार करून कामगार वर्गाचे तसंच कष्टकरी मोल-मजुरांचे तांडेच्या तांडे आपापल्या राज्यात निघाले आहेत. गाड्यांची सोय नसल्याने ते सध्यातरी पायी चालत आहेत. शेकडो किलोमीटर्सचा प्रवास त्यांनी पायी केला आहे, हे चित्र चांगलं नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

मजुर वर्ग चालत निघाला आहे हे चित्र चांगले नाही. लहान मुले त्यांच्याबरोबर आहेत. रेल्वे मजूरांसाठी गाड्या सोडायला तयार नाही, असं सांगत राज्य सरकारने खाजगी वाहनांना परवानगी देणे गरजेचे असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

लोकं चालताना आजारी पडत आहेत. मरत आहेत. त्यांचे चालणे तरीही थांबले नाही. बेकायदेशीर निघालेच आहेत ना?, असा सवाल उपस्थित करत केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने मजुरांसाठी विशेष व्यवस्था करावी, असं त्यांनी सूचित केलं आहे.

मजुरांप्रती आपल्या भावना व्यक्त करताना संजय राऊत ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, “मजुर वर्ग चालत निघाला आहे हे चित्र चांगले नाही. लहान मुले तयांचया बरोबर आहेत. रेलवे त्यांच्या साठी गाड्या सोडायला तयार नाही. राज्य सरकारने खाजगी वाहनांना परवानगी देणे गरजेचे आहे. लोकं चालताना आजारी पडत आहेत. मरत आहेत. तयांचे चालणे तरीही थांबले नाही.बेकायदेशीर निघालेच आहेत ना?”

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

अजानसाठी लाऊड स्पीकरचा होणारा वापर बंद करावा; जावेद अख्तर यांची मागणी

राज्यातला कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार… मात्र दिलासादायक बाब म्हणजे 3800 बरे होऊन घरी!

महत्वाच्या बातम्या-

केंद्राच्या असंवेदनशील अवस्थेमुळे स्थलांतरित मजुरांची दैन्यावस्था; काँग्रेसची टीका

माझी प्रकृती ठणठणीत आहे, मला कोणताही आजार नाही- अमित शहा

“राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये, अन् 3 पक्षांचं सरकार कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More