देश

प्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत

अयोध्या |  प्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी अयोध्येतल्या पत्रकार परिषदेत केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर शिवसेनेचे सर्व खासदार घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

उद्धव ठाकरे दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी अयोध्येला येणार आहेत. तसेच राम मंदिर मोदी-योगी ही जोडीच उभारणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, राम मंदिर निर्माणाचे कार्य लवकर चालू केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत, या राऊतांच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी मात्र त्यांची चांगलीच खिल्ली उडवली.

महत्वाच्या बातम्या

-मुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील

-शरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का??; उदयनराजे चिडले

-वर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील

-बड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट

-उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या