बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“40 बंडखोर आमदारांच्या फक्त बॉड्या महाराष्ट्रात येणार”

मुंबई | एकनाथ शिंदे यांचा बंड आणि नंतर सुरु झालेला राजकीय गोंधल थांबण्याचं नाव घेईना. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेकडून ठिकठिकाणी सभा आणि मेळाव्यांचं आयोजन केलं जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे शिंदे गटावर सध्या आपल्या सभांतून आग ओकत आहेत.

दहीसर येथील एका मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. राऊत भाषणात म्हणाले, आसामला जे 40 आमदार आहेत ती जिवंत प्रते आहेत. मुडदे आहेत. त्यांच्या बॉड्या इकडे येणार आहेत. हे चाळीस लोक जेव्हा मुंबईत उतरतील तेव्हा त्यांचे आत्मे मेलेले असतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर टिका केली.

आमदार जेथे थांबले आहेत तेथे गुवाहाटीला कामाख्या देवीचे मंदिर जागरुक मंदिर आहे. तेथे रेड्यांचा बळी देतात. आम्ही इकडून 40 रेडे पाठवले आहेत. शिवसेने विरोधात मोठे कट कारस्थान सुरु आहे. त्यावर लढा देऊन मात करु. अरे तुम्ही शिवसेनेशी लढणार? मेले तुम्ही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टिका केली.

एकनाथ शिंदे हे केवळ शिवसेनेतच मुख्यमंत्री होऊ शकतात. आज त्यांच्याजवळ 40 आमदारांची फौज असली तरी या आकड्यांत पैशाली चटावलेले बाजारबुणगेच जास्त दिसतात. ईडीच्या भितीने वर्षानुवर्षाच्या निष्ठा विकणारे उद्या शिंदे यांना सोडूनही पळ काढतील अशा तिखट शब्दात बंडखोरांची कानउघडणी केली.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन

“राज्यातील हालचाली पाहता काहीही घडू शकतं, त्यामुळे…”

‘मरण आलं तरी बेहत्तर पण…’; एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट चर्चेत

‘जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर…’; बंडखोर आमदाराचं वक्तव्य

“शिवसेना म्हटलं की मोदी, शहा पण घाबरून रस्ता बदलतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More