Top News महाराष्ट्र मुंबई

…म्हणून तर आम्ही 105 आमदार घरी बसवले आहेत- संजय राऊत

मुंबई | कारशेडवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना हा देशात अजिंक्य असा पक्ष आहे म्हणूनच आम्ही 105 आमदार घरी बसवले असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विक्रोळीमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

इतकंच नाही तर काहीही करा मेट्रोची कारशेड कांजूरलाच होणार आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालो आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातली शिवसेना देशात अजिंक्य असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपचे यावेळी 105 आमदार आहेत तर पुढच्या विधावसभेला शिवसेनेचे 105 आमदार असतील, असा विश्वसही राऊतांनी बोलताना व्यक्त केला. यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार; ‘या’ सरकारनं घेतला मोठा निर्णय

चारचाकी चालकांसाठी आनंदाची बातमी; सरकार लवकरच हा निर्णय लागू करणार!

अंबानींच्या ॲाफीसवर मोर्चा; बच्चू कडू, राजू शेट्टींसह ‘हे’ दिग्गज नेते होणार सहभाग

सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; ‘या’ मुद्द्यांकडे वेधलं लक्ष!

“गोपीचंद पडळकरांना अजून अजित पवार कळले नाहीत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या