संजय राऊतांनी भाजपला दिला ‘हा’ गंभीर इशारा, म्हणाले…
नवी दिल्ली | शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सुडाच्या कारवाया केल्या जात असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपच्या दोन-पाच लोकांना हाताशी पकडून कशा प्रकारे एक क्रिमिनल सिंडिकेट चालवत आहेत याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला पोहोचवणं हे संसदेचा सदस्य आणि शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर अशी माहिती मी वारंवार देईल. यानंतर मुंबईत येऊन याबाबद पत्रकार परिषद घेईल, असंही राऊत म्हणाले.
केंद्र सरकारच्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरू आहेत. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या कारवाया सुरू आहेत. महाराष्ट्रात जरा जास्तच सुरू आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर जे चिखल फेकत आहेत त्यांचे हातसुद्धा किती बरबटलेले आहेत, ते सुद्धा देशाला कळायला हवं, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
दरम्यान, मुंबई, महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणा यावर काम करतीलच. पण केंद्रातल्या यंत्रणा काय करत आहेत, हे देखील यानिमित्ताने कळेल. तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाहीत, महाराष्ट्रातही आहेत, असं सूचक वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
युक्रेनच्या रस्त्यावर महाकाय रशियन फौज, धक्कादायक फोटो समोर
Petrol Diesel Price : महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन दरात काय बदल झाले, वाचा एका क्लिकवर
युक्रेनमधून 182 विद्यार्थी मुंबईत, नारायण राणेंनी विमानतळावर केलं स्वागत
डायबिटीज पेशंट असाल तर ‘या’ भाज्यांचा करा आहारात समावेश, शुगर राहिल कंट्रोलमध्ये
रशिया-युक्रेन युद्धाचा फटका बसला, सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागला
Comments are closed.