‘देशद्रोही निर्लज्ज माणूस’, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्लाबोल
मुंबई | आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) जोरदार निशाणा साधला आहे. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणात फसवणूक केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
आयएनएस विक्रांत फाइलवरून किरीट सोमय्यांना प्रश्न विचारला असता ते उत्तर न देता पत्रकार परिषदेतून उठून निघून गेले. किरीट सोमय्यांनी या प्रकरणावर बोलायचं टाळल्याने संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर आणखी एकदा हल्लाबोल केला आहे.
किरीटजी… पैसे काय केले? उत्तर नाही. पत्रकार परिषदेतून पळून गेले. देशद्रोही. निर्लज्ज माणूस, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत किरीट सोमय्यांवर टीका केली आहे.
दरम्यान, याच प्रकरणावरून संजय राऊतांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devenda Fadnavis) यांच्यावर देखील टीका केली होती. तुम्ही अभ्यास करून बोलता असा दावा करता मग तुमच्याकडे असा काय पुरावा आहे की भ्रष्टाचार झाला नाही? आम्ही सांगतो तो पुरावा नाही का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
किरीटजी… पैसे काय केले?
उत्तर नाही.
पत्रकार परिषदेतून पळून गेले.
देशद्रोही. निर्लज्ज माणूस.@PMOIndia @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @sanjayp_1 @anjali_damania
@ https://t.co/OEavnFiFch— Sanjay Raut (@rautsanjay61) April 7, 2022
थोडक्यात बातम्या-
एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर
संजय राऊतांचा थेट फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले…
मोठी बातमी! राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच, प्रसिद्ध अभिनेत्रीचा राष्ट्रवादीत प्रवेश
“फडणवीसांनी सोमय्यांना जोडे मारले पाहिजेत, तेच वकिली करत आहेत”
संजय राऊतांच्या टीकेला अमित शहांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
Comments are closed.