बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?”

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरूवारी विधानसभेत आणखी एक पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला. देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एका नव्या पेनड्राईव्हचा उल्लेख करत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीसांनी आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे.

इतकं नीच आणि हलकट पातळीवरचं राजकारण या महाराष्ट्रात कधीही झालं नव्हतं. आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहेत का? उलट तुमचे संबंध आहेत. यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का? हे बघावं लागेल, असा खोचक टोला संजय राऊतांनी फडणवीसांना लगावला आहे. तर आम्ही एकच कव्हर मारू खाटकन, असा इशारा देखील राऊतांनी दिला.

दरम्यान, फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवरून राऊतांनी जोरदार टीका केली. नुसतं बोंबलून चालतं का? रोज एक खोटं भंपक प्रकरण तयार करतात. कसंकाय त्यांना हे बाळंतपण जमतं माहिती नाही. कुठुण सुईण आणतात हे खोट्या प्रकरणांची बाळंतपण करण्यासाठी?, असा खोचक सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ; वाचा ताजे दर

“देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात अन् बेडवरून खाली पडतात”

“The Kashmir Files टॅक्स फ्री करण्यापेक्षा Youtube वर टाका”

मोठी बातमी! PM Kisan योजनेत सरकारने केला ‘हा’ मोठा बदल

“ठाकरे सरकार म्हणजे खाऊंगा भी और खानेवालो की रक्षा भी करुंगा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More