बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“त्यांना खाजवण्याची सवय आहे आणि त्यामुळे त्यांची चमडी फाटणार”

मुंबई | राज्यभर सुरू असलेल्या भोंग्याच्या वादानंतर सोमवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हजर नसल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला.

ज्या बैठकीला मुख्यमंत्रीच उपस्थित नाहीत त्या बैठकीला आम्ही जाऊन काय करायचं?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला होता. तर फडणवीसांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या कारभारावरूनही टीका केली होती. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

त्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची गरज नव्हती. तो गृहखात्याचा विषय होता. विरोधी पक्षाला काहिना काही खाजवण्याची सवय आहे. ते सतत खाजवत असतात. पण मी सांगतो त्यांनी फार खाजवत बसू नये. त्यामुळे त्यांची चमडी फाटणार आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, तुमचीच मागणी होती ना मग बहिष्कार कसा टाकता? त्यांना अराजकता निर्माण करायची आहे. गोंधळ करायचा आहे. यालाच राजद्रोह म्हणतात. विरोधी पक्ष घंटा वाजवत बसले आहेत त्यांनी वाजवत बसावं, असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘एवढी लुच्चागिरी तर फक्त…’, राऊतांच्या टीकेवर सोमय्यांचा पलटवार

मोठी बातमी! राणा दाम्पत्यांना न्यायालयाचा झटका

“एखादा माथेफिरू हल्ला झाला म्हणून स्वत:च्या ओठाला टोमॅटो सॉस लावून फिरत असेल तर…”

रशियाच्या धमकीला न जुमानता अमेरिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More