बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीसांनी सोमय्यांना जोडे मारले पाहिजेत, तेच वकिली करत आहेत”

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आयएनएस विक्रांत फाईल (INS Vikrant) बाहेर काढत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर नव्याने आरोप केले. त्यानंतर संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्यांवर खोचक शब्दात टीका केली आहे.

किरीट सोमय्यांनी जमा केलेल्या पैशांचा घोटाळा हा देशात घडलेल्या घोटाळ्यातील सर्वात मोठा प्रकार आहे. असं असतानाही नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असलेले भाजपचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे किरीट सोमय्यांची वकिली कशी करू शकतात?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

सोमय्यांनी केलेला भ्रष्टाचार ऐकून राष्ट्रीय स्वयंसंघाचे गोळवलकर गुरूजी, बाळासाहेब देवरस, हेडगेवार यांचा जीव तीळतीळ तुटला असेल, त्यांच्या आत्म्याला काय वाटलं असेल. सोमय्यांना फडणवीसांनी जोडे मारले पाहिजेत. तेच सोमय्यांची वकिली करत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, आयएनएस विक्रांतबद्दल देशभावना आहेत. शहिदांच्या बलिदानाच्या पैशांचा लिलाव करून सोमय्यांनी पैसा जमवला. सोमय्यांचा मुखवटा गळून पडला आहे. सोमय्यांना अटक व्हावी यासाठी शिवसेना (Shivsena) राज्यभर आंदोलन करणार आहे, असा इशारा देखील किरीट सोमय्यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांच्या टीकेला अमित शहांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

“अचानक अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळेच…”

“…मग नवाब मलिक तुरूंगात असताना पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का नाही दाखवली? “

कोरोनाच्या XE व्हेरिएंटबद्दल तज्ज्ञांचा धक्कादायक दावा, म्हणाले…

पुतिन यांच्या मुलींविरोधात अमेरिकेने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More