मुबंई | लोकसभा सचिवालयाकडून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काही शब्दांंना निर्बंध घातले आहेत.आता संसदेत भाषण करताना काही शब्द वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. हे शब्द वापरल्यास तुम्हाला संसदेतून निलंबित केलं जाऊ शकतं. यासंबधी अनेक नेत्यांनी विरोधही केला होता. शिवसेना (Shiv Sena) प्रवक्ते संजय राऊत यांनी यासंबधी माध्यमांशी संवाद साधला.
अशा प्रकारचे निर्णय घेऊन लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. लोकशाहीचे पंख आणि पाय छाटण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये ते जर यशस्वी झाले तर आणखी मोठे निर्णय(decision) घेतले जाऊ शकतात, असंही ते म्हणाले
गांधीच्या पुतळ्याखाली आंदोलन करत होतो. त्यावरही बंदी घालण्यात आली आहे. नेमकी भिती कसली आहे? लोकशाहीची भीती एखाद्या सरकारला वाटत असेल तर या देशात लोकशाहीला सर्वाधिक धोका आहे. हे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलं आहे. लोकांचे प्रतिनिधी (representative of the people) जे जनतेचे परखड भाषेत प्रश्न मांडतात. त्यांची मुस्कटदाबी करत असाल तर या देशात लोकशाही आहे का? असा प्रश्न आम्हाला त पडलाच आहे पण जगाला देखील पडला आहे, अशी टीका केंद्र सरकारवर माध्यमांशी बोलताना राऊतांनी केली.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंनी (Mallikarjun Kharge) उद्या संध्याकाळी विरोधकांची बैठक बोलावली आम्ही त्याला जाऊ आणि भावना व्यक्त करू, असं त्यांनी सांगितलं. तसेत या बैठकीत पुढची रणनिती ठरणार आहे, असंही ते म्हणाले.
थोडक्यात बातम्या
“राज्याच्या राजकारणात एक दुजे के लिए सिनेमा सुरु”
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय!
“दोन वाडपे व्यवस्थित वाढत असतील तर 40 जणांची काय गरज”
“सत्ता असो वा नसो बारामतीचा विकास थांबणार नाही”
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून आणखी एका बड्या नेत्याची हकालपट्टी
Comments are closed.