बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कालची आलेली पोरं पवारांना टार्गेट करतायत हे मोदींना पटतं का?”

नवी दिल्ली | विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले. यानंतर फडणवीसांचं कौतुक करताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.

फडणवीस सर्वांना पुरून उरतील. असे अनेक ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात, अशी टीका नितेश राणेंनी केली होती. राणेंच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पवारांची पाठराखण करताना राऊतांनी नितेश राणेंना देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

कालची आलेली पोरं शरद पवारांना टार्गेट करतायत, असा अप्रत्यक्ष टोला राऊतांनी नितेश राणेंना लगावला आहे. तर ज्या भाषेत ते पवारांबद्दल बोलतात हे फडणवीसांना मान्य आहे का? हे मोदींना मान्य आहे का? हे नितीन गडकरींना मान्य आहे का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात सुडबुद्धीने काम करतायत. त्यांना टार्गेट दिलं जातंय. महाविकास आघाडीतील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. विरोधी पक्षातील मुख्य नेत्यांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! कोरोनाबाबत ‘ही’ अपडेट आली समोर

सरकारची भन्नाट योजना, ‘इतक्या’ वर्षात तुमचे पैसे होतील डबल

देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

आनंदाची बातमी! आता फक्त ‘इतक्या’ रूपयात मिळेल गॅस सिलेंडर

“नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More