“एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येला जायला निघाले”
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक हिंदुत्वाचा पवित्रा घेत मशिदींवरील भोंग्यांविरोधात तीव्र भूमिका घेतली. राज ठाकरेंनी तिन सभा घेत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
तिन्ही सभांतून महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) सडकून टीका केल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांचा अयोध्या दौरा जाहीर केला. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निशाणा साधला आहे.
राज ठाकरेंनी उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांच्या विरूद्ध मराठी माणसांच्या अस्मितेसाठी एक भूमिका घेतली होती. आता एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येला जायला निघाले, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी अयोध्येत घर बांधलं, आश्रम घेतला तर हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना आणि अयोध्येचं नातं राजकीय नाही. आम्ही तिथे सतत येत जात असतो. आंदोलनापासून आमचा तिथे संबंध आहे, असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘दरेकर साहेब…’; रोहित पवार आणि दरेकरांमध्ये रंगला ट्विटर वॉर
तारक मेहताच्या एका भागासाठी शैलेश लोढा यांना मिळायचे ‘इतके’ लाख, मानधन ऐकून थक्क व्हाल
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
मन उडु उडु झालं! मराठमोळ्या पद्धतीने पार पडला ह्रता आणि प्रतीकचा लग्न सोहळा, पाहा फोटो
राज्यासाठी पुढचे चार दिवस महत्त्वाचे; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार
Comments are closed.