Sanjay Raut | लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यातील रणधुमाळीत राज्यासह देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते एकमेकांवर शाब्दिक प्रहार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हटलं होतं. इतकंच नाही तर, नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकविल्याचा आरोप देखील मोदींनी केला होता. त्याला आता ठाकरे गटाकडून जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलंय.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी होर्डिंगचा मुद्दाही समोर आणत भाजपवर टीका केली. ज्या रस्त्यावर लोकांचा मृत्यू झाला तिथे पंतप्रधानांनी रोड शो केला, असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला.
“..यासारखी अमानुष गोष्ट नाही”
“एका माणसाचा प्रचार सुरळीत व्हावा यासाठी लोकांच्या गैरसोय करणारा पंतप्रधान पहिल्यांदा पाहिला. मोठा होर्डिंग पडून ज्या ठिकाणी सतरा लोकांचा जीव गेला त्या ठिकाणी प्रधानमंत्री रोड शो करतात. यासारखी अमानुष गोष्ट नाही.हे सगळं कोणासाठी? अशा प्रकारचा प्रचार कधी देशात झाला नव्हता.असे कोणतेही पंतप्रधान या आधी पाहिले नाहीत”,अशी टीका राऊत (Sanjay Raut ) यांनी केली आहे.
मोदींच्या रोड शोमुळे मुंबईत नोकरदारवर्गाचे प्रचंड हाल झाले. मेट्रो सेवा खंडित झाल्याने घाटकोपर स्थानकावर चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तर, दोनच दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामुळे घाटकोपरमध्येच काही जणांचा मृत्यू झाला. यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
“पैसा फेको तमाशा देखो हाच यांचा जाहीरनामा”
“पैसा फेको तमाशा देखो हाच यांचा जाहीरनामा आहे. हेलिकॉप्टरमधून खोके पेटी उतरवायच्या, पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे, लाखो मते विकत घेण्याच्या योजना करायच्या, रेटून खोटं बोलायचं हाच त्यांचा जाहीरनामा. त्यामुळे नव्याने जाहीरनामा करण्याची त्यांना गरज नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की, “ज्यांनी पक्ष चोरला तेच इतरांना चोर बोलत आहेत. पण चोरी झाली हे मान्य केले. चोर कोण आहे? चोराला मदत कोणी केली? चोराला मदत करणारे पंतप्रधान, गृहमंत्री, निवडणूक आयोग हे चोरांचे सरदार आहेत. म्हणून आम्हाला देशात परिवर्तन आणायचं आहे”, असंही संजय राऊत म्हणाले. तसंच, “पक्ष आम्ही सांभाळला आहे, 4 जूनला कळेल की शिवसेना, राष्ट्रवादी कोण आहे?”, असं राऊत (Sanjay Raut )यांनी सांगितलं.
News Title – Sanjay Raut criticism of Narendra Modi road show in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटप्रेमींनो ‘या’ दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान हायव्होल्टेज लढत
मतदानाच्या आकडेवारीने आढळरावांचं टेंशन वाढवलं; कोल्हेंना फायदा होणार?
लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? श्रेयस तळपदेचं वक्तव्य चर्चेत
मौलवी उपचाराच्या नावाखाली करत होता बलात्कार, महिलेचा धक्कादायक दावा
ऐश्वर्या रायचा अपघात, अशा परिस्थितीत दिसल्याने बॅालिवूडमध्ये खळबळ