Sanjay Raut | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कालच (17 मे) मुंबईत भव्य सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर दिसून आले. मोदींनी या सभेत देखील विरोधकांवर निशाणा साधला. या सभेच्या दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत रोड शो देखील केला. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. मोदींच्या रोड शोवर कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं राऊत म्हणाले आहेत.
इतकंच नाही तर, मोदींच्या रोड शोसाठी मुंबई पालिकेने पैसे खर्च केले ते वसूल करा आणि मोदी यांच्यावर गुन्हा दाखला करायला हवा, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे. संजय राऊत आज माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी अनेक आरोप केले.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“मुंबई पालिकेनं भाजपच्या रोड शोचा खर्च उचलला आहे. मुंबई महानगरपालिकेने 3 कोटी 56 लाख रुपये या रोड शो साठी खर्च केला आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यासाठी भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.”, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
हा खर्च भाजपच्या किंवा मोदींच्या पर्सनल खात्यातून व्हायला हवा होता. 3 कोटी 56 लाख रुपयाचा खर्च मुंबई महापालिकेने केलाय. मी पंतप्रधान म्हणत नाहीये. भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा, अशी मागणी यावेळी राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की, “3 कोटी 56 लाख रुपये हे ज्या उमेदवारांच्या रोड शो साठी खर्च झाले आहे त्या भागातील उमेदवारांकडून ते वसूल केले पाहिजे. ही मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट आहे.”, असा संताप देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
“मुंबई पालिकेचे पैसे वसूल करा”
कधीही मुंबईत येतात, रोडशो करता आणि मुंबई बंद करता. काय चालले आहे या मुंबईत? तुम्ही या आणि तुमच्या हिंमतीवर जा. मुंबईकरांना वेठीस धरायचे नाही. मुंबईच्या तिजोरीवर जो भार टाकत आहे तो अत्यंत गंभीर गुन्हा आहे. मुंबईच्या रोड शो चे पैसे ताबडतोब वसूल करावे आणि त्या संदर्भात काय कारवाई झाली हे निवडणूक आयोगाने आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जनतेसमोर आणावं, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.
News Title : Sanjay Raut criticism of Narendra Modi Roadshow in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; यलो अलर्ट जारी
मोठ्या उसळीनंतर सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर
भाजपच्या ‘या’ उमेदवारानी पैसे वाटले? ठाकरे गटाचा आरोप; फडणवीस थेट…
उद्धव ठाकरेंचा संबंध “भगव्याशी नाही तर फक्त हिरव्याशी”…’या’ बड्या नेत्याचा हल्लाबोल
गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा संभवतो; या राशीच्या व्यक्तींनी करावी गुंतवणूक