Top News

राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्यावरुन संजय राऊत आक्रमक; पुन्हा केलं ट्विट

मुंबई | मी काही राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा ट्विट करुन त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग सावरकर माने तप , सावरकर माने तत्व … असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेली ही कविता आहे.

वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू ,गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत, असं ट्विट राऊतांनी काल रात्री केलं होतं.

दरम्यान, सावरकरांच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद दिसत आहेत. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहावं लागेल.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या