Top News

“शिवसेना नेतृत्वाने गेली 5 वर्षे भाजपची लाचारी केली आता काँग्रेसची करतंय”

मुंबई | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी काल एक वक्तव्य केलं होतं. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेनं यावर आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी यावरुन मनसेने निशाणा साधला आहे.

शिवसेना नेतृत्वाने गेली पाच वर्षे भाजपची लाचारी केली आता काँग्रेस ची करतायत, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

जे माननीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ज्यांच्या पोटात आग आहे. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की लाचारीची श्रीखंड पुरी खायची की राजसाहेबांना साथ देऊन कष्टाची मीठ भाकर खायची, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, नेहरू ,गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा, असं संजय राऊत म्हणाले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या