बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवारांनी 2 दिवसांत धोबीपछाड दिल्याने 6 महिने झाले भाजपवाले झोपलेच नाहीत”

मुंबई |  आजच्या सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला चांगलंच झोडपून काढलं आहे. शरद पवारांच्या कोकण दौऱ्यावर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना तर राऊतांनी जोरदार फटकारत ‘कोथरूडचे उपरे पाटील’ अशी उपमा दिली आहे तर भाजपवर जोरदार आसूड ओढले आहेत.

भाजप नेत्यांनी कोकण दौरा केला म्हणून मुख्यमंत्री आणि शरद पवारांना कोकणचा दौरा करावा लागला, असा दावा पाटील यांनी केला होता. त्यावर आजच्या अग्रलेखात राऊत म्हणाले, “भाजपचे नेते सहा महिन्यांपूर्वी मध्यरात्रीच जागे झाले. त्यांनी राजभवनात पहाटे शपथ सोहळे केले, पण पवारांनी दोन दिवसांत धोबीपछाड दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून भाजपवाले झोपलेलेच नाहीत. डोळे सताड उघडे ठेवून जागेपणी महाराष्ट्रात पुन्हा सत्ता येण्याची ते वाट पाहात आहेत. त्यामुळे पवार कोठे गेले, किती वाजता गेले, त्यांना कधी जाग आली वगैरे नोंदी ते आता ठेवू लागले आहेत. संकटकाळात महाराष्ट्राचे सरकारही जागेच आहे, पण विरोधकांचा धृतराष्ट्र झाला त्याला काय करायचे? त्यांना चांगले काही दिसत नाही.”

शरद पवारांना आता जाग आली का? असा उटपटांग सवाल चंद्रकांत पाटलांनी करावा हे त्यांच्या स्वभावास धरूनच आहे. कोणी चांगले, महाराष्ट्रहिताचे काम करीत असेल व कोथरूडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही असे सहसा घडत नाही, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संपूर्ण देश कोरोनाग्रस्त झाला आहे हे सत्य, पण महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोना आणि निसर्ग वादळ असे बेकाबू संकट कोसळलेले असूनही कमालीचे राजकारणग्रस्त झाले आहेत. त्यांची कीव करावी तेवढी थोडीच आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

“अहो, कोथरूडचे उपरे पाटील….. शरद पवारांना संकटकाळात जाग असतेच”

काळजी करू नका, कोकणवासियांच्या पाठीशी आमचं सरकार खंबीरपणे उभं- मुख्यमंत्री

ICICI व्हेंच्युअरतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटींची मदत, उद्धव ठाकरेंनी मानले आभार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More