“एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सुचतात”
मुंबई | देशाच्या स्वातंत्र्याबद्दल बेताल वक्तव्य करून कंगणाने पुन्हा एकदा देशवासियांचा संताप ओढावून घेतला आहे. विविध क्षेत्रातून तिच्या वक्तव्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर कंगणाला कालपासून चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं आहे.
आता संजय राऊत यांनी कंगणाला टिळक एकदा म्हणाले होते ‘एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सुचतात’ हे वाक्य कंगणाला तंतोतंत लागू पडतं, असा खोचक टोला लगावला आहे. संजय राऊतांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आग्रलेखातून कंगणाच्या वक्तव्यावर ताशेरे ओढले आहेत.
स्वातंत्र्यसैनिकांचा इतका भंयकर अपमान कधीच कुणी केला नव्हता. कंगणाने भगतसिंगापासून विर सावरकरांपर्यंत सगळ्यांवरच अफू-गांजाच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवलं आहे. अशा कंगणाला देशाच्या सर्वोच्च अशा नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हे देशाचे दुर्दैव असल्याचंही राऊतांनी आग्रलेखात म्हटलं आहे.
अशा व्यक्तीस पद्ममश्री पुरस्कार देशाचे राष्ट्रपती देतात. त्या सोहळ्यास देशाचे पंतप्रधानही उपस्थित असतात शिवाय ते स्वांतत्र्याला भिकेची उपमा देणाऱ्या कंगणाबेनचे डोळे भरून कौतुक करतात. भाजपला स्वांतत्र्यसैनिकांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असेल तर तर त्यांनी कंगणाला दिलेले पुरस्कार माघारी घ्यावेत, असा घणाघातही सामनातून केला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘लगता है मोहतरमा…’; नवाब मलिकांचं कंगणावर टीकास्त्र
भाजपच्या माजी मंत्र्यावर नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप!
“लाज लज्जा असेल तर कंगणाने देशाची माफी मागावी”
महाराष्ट्रातून महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार- जे. पी. नड्डा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती!
Comments are closed.