बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधींनी मजुरांच्या व्यथा जाणून घेतल्याने निर्मलाताईंना दुख: झालं हे अक्रितच”

मुंबई |  दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्थलांतरित मजुरांशी बोलून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. त्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींना एवढंही कळू नये की आता गप्पा मारायची वेळ नाही, अशी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आजच्या सामनामधून समाचार घेण्यात आला आहे.

राहुल गांधी हे दिल्लीच्या रस्त्यांवर त्या मजुरांसोबत थांबले , थोडा वेळ बसले आणि बोलले. यावर निर्मलाताईंना अत्यंत दु:ख व्हावे हे आक्रितच म्हणावे लागेल, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कुणी श्रमिकांचे दु:ख हलके करीत असेल तर सरकारला त्याचा आनंद व्हायला हवा, पण इथे उलटेच सुरू आहे, असा टोला त्यांनी निर्मला सीतारामन यांना लगावला आहे.

मंत्री लॉक डाऊन कुरवाळत बसले आहेत. मजूर लॉक डाऊन तोडून कच्च्या-बच्च्यांसह रस्ते तुडवत निघाले आहेत. त्या रस्त्यांवर विरोधी पक्षाचा एक नेता गांधी नावास जागून मजुरांना कवटाळत उभा राहिला याचे ज्यांना दु:ख होते त्यांनी यापुढे माणुसकी व परंपरेच्या गप्पा मारू नयेत, असं टीकास्त्र त्यांनी भाजपवर सोडलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद

अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड

महत्वाच्या बातम्या-

मन मोठं असावं लागतं… भिकाऱ्याने 100 कुटुंबाला दिलं महिन्याभराचं राशन आणि 3 हजार मास्क

मी टीकेचा धनी होईन, महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायची माझी तयारी आहे- उद्धव ठाकरे

कोरोनामुक्त झालेल्या केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी टोपेंचा संवाद; शैलजांनी दिला कानमंत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More