महाराष्ट्र मुंबई

“शिवसेनेच्या पाठीत वार करणारे आजच्या घडीला घायाळ”

मुंबई | शिवसेनेच्या पाठीत वार करणारे आजच्या घडीला घायाळ झाले आहेत, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईमध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना सोडून गेलेल्या सगळ्यांवर निशाणा साधला.

कलम 370 रद्द करणं ही भूमिका सर्वात पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. आत्ताचं सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरच चालत आहे, असंही संजय राऊत यांनी  म्हटलं आहे. तसेच
संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

गेल्या पाच वर्षात विरोधकांची अवस्था एवढी वाईट झाली की महाराष्ट्रात विरोधकच उरले नाहीत. विरोधक आधी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचं काम करायचे आता मात्र गेल्या पाच वर्षात ती भूमिकाही शिवसेनेच बजावली, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एक पाऊल मागे गेलो म्हणून काळजी करु नका. एक पाऊल मागे जातो तेव्हा मारायची असते ती अधिक उंच उडी, असं म्हणत राऊत यांनी भाजपलाही टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या