Top News महाराष्ट्र मुंबई

“ठाकरे सरकार 11 दिवसही टिकणार नाही, असं म्हणणार्‍यांचं बारावं घालून सरकारने 6 महिने पूर्ण केले”

मुंबई |  राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुजरातेत जाऊन करण्याची हिम्मत दाखवावी, महाराष्ट्रात नाही. ठाकरे सरकार अकरा दिवसही टिकणार नाही, असे बोलणार्‍यांचे बारावे-तेरावे घालून या सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी भाजपचा जोरदार समचार घेतला आहे. तसंच राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या विरोधकांना राज्यपालांनी खडेबोल सुनावायला हवेत, असं ते म्हणाले आहेत.

कोरोनाचे संकट नसते व सर्व काही आलबेल असते तर सरकारने सहा महिने पूर्ण केले या आनंदाप्रीत्यर्थ विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवण घालता आले असते, पण आता सरकारचे सर्व लक्ष कोरोनावर लढण्यावर आहे, असा टोला त्यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.

सरकारविरोधात ठणाणा बोंबा मारणे हे विरोधी पक्षाचे उद्योग आहेत. अशा बोंबा ठोकल्याने सरकारचा बालही बाका होणार नाही. विरोधी पक्षाचे सध्या 105 चे बळ आहे, ते कायम राहावे, अशा आमच्या त्यांना सदिच्छा आहेत, पण सरकारचे 170 आहेत, त्याचे दोनशे झालेच तर विरोधकांनी सरकारला दोष देऊ नये, असा इशारा देखील राऊत यांनी आजच्या अग्रलेखाच्या माध्यमातून दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

काँग्रेसचा हात उद्धव ठाकरेंबरोबरच… काँग्रेस सरकारबाहेर पडणार म्हणणाऱ्यांना राहुल गांधींनी सुनावलं

फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतल्या आकडेवारीवर पृथ्वीराज चव्हाणांचं चॅलेंज, म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

या भारतीय अॅपचा टिकटॉकला जबर दणका; टॉप चार्टमध्ये टिकटॉकला मागे टाकत दुसऱ्या नंबरवर

विरोधकांचा दृष्टिकोण महाराष्ट्र हिताचा नाही, राज्यपालांनी त्यांना ‘खडेबोल’ सुनवायला हवेत- संजय राऊत

राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी 14 दिवसांवर आणण्यात ठाकरे सरकारला यश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या