बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसलेत, एक-दोन नगरमध्ये तर 2 तळकोकणात”

मुंबई |  राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे आणि नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. निदान स्वतः फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्‍या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणार्‍यांना महाराष्ट्र माफ करीत नाही हे त्या प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले. विखे-पाटील हे तर विरोधी पक्षनेते असतानाच भाजपमध्ये विलीन झाले. अशी हिंमत (लाचारी नव्हे!) अंगात भिनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. थोरात वगैरे मंडळींचे कष्ट त्या दिशेने तोकडे पडले इतकेच म्हणावे लागेल. पक्ष संकटात असताना ज्यांनी उंदरांप्रमाणे उड्या मारल्या नाहीत व बुडते जहाज वाचवण्याचे प्रयत्न केले अशांना इतिहासाच्या पानावर स्थान मिळते. अशा एखाद्या पानावर विखे-पाटील कोठे आहेत काय? विखे-पाटलांनी काँग्रेसचा त्याग केल्याने काँग्रेसचे नुकसान झाले नाही व भाजपमध्ये गेल्याने भाजपचा दीडकीचा फायदा झाला नाही, असं राऊत म्हणाले आहेत.

विखे यांनी ऐनवेळी पलायन केले नसते तर आज ते सरकारात काँग्रेसचे नेते असते. ती जागा नियतीने थोरातांना मिळवून दिली. कोलांटउडीचे डोंबारी राजकारण प्रत्येकवेळी चालतेच असे नाही. विखे-पाटील यांनी भाजपवर काय काय मळीच्या गुळण्या टाकल्या आहेत हे त्यांनीच एकदा आठवून पाहावे. विखे-पाटील अधूनमधून बोलतात, ”आम्ही भाजपमध्ये खूश आहोत.” जे विखेंना ओळखतात ते यावर विश्वास ठेवणार नाहीत, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

झक मारली आणि भाजपमध्ये गेलो या चिडीतूनच विखे टाळूवरचे केस उपटत असतील. महाराष्ट्राचे ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकट हाकले जात आहे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे. वैफल्य, दुसरे काय! असं राऊत म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या- 

कोरोनावर मात केल्यानंतर आव्हाड पुन्हा मैदानात, पिंपरी चिंचवडच्या झोपपट्टीसंदर्भात केली मोठी घोषणा

आई-बाप दगड फोडायचे; मात्र बेलदाराचं पोर झालं डीवायएसपी!

महत्वाच्या बातम्या-

“विखे-पाटलांच्या पोटात खळबळ माजण्याचे कारण काय?, विखे तर तडफडणाऱ्या माशांचे प्रतिनिधी”

पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला, आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला आणि पडला”

सुशांत सिंग राजपूत पुनर्जन्म घेईन आणि त्याचा जन्म माझ्या पोटी होईल, या अभिनेत्रीचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More