बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माणसाचं मन भरकटलं की अशी माणसं गांजा प्यायल्यासाारखी बोलतात”

मुंबई | विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापलेलं आहे. भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. भाजप नेत्यांची मन:स्थिती चांगली नसल्याचंही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेसोबत युती ही आमची ऐतिहासिक चूक होती असं म्हटलं होतं. त्यावरून संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “माणसाचं मन भरकटलं की अशी माणसं गांजा प्यायल्यासाारखी बोलतात. राजकारणात विरोधीपक्ष ज्या पद्धतीने भरकटला आहे, ते पाहाता त्यांच्याकडून आपण कोणत्या वक्तव्याची अपेक्षा ठेवणार आहात?” असं राऊत यावेळी म्हणाले आहेत.

“सुधीर मुनगंटीवार यांना मी अत्यंत संयमी, अभ्यासू नेते समजत होतो. त्यांची विधानसभेतील आणि बाहेरची भाषणं मी पाहतो. पण कुणी कुणाबरोबर जावं आणि कुणी कुणाबरोबर रहावं हा त्यांचा प्रश्न नसून महाराष्ट्रात तीन पक्षांनी काय करायचंय ते ठरवलंय.” असा घणाघातही राऊतांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना पत्रकारांनी शिवसेनेसोबत युतीबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर मुनगंटीवारांनी शिवसेनेसोबत युती ही आमची ऐतिहासिक चूक होती. आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणं योग्य होतं, असं उत्तर दिलं होतं. त्यावरून संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

पोस्टरबाजी: “नितेश राणे हरवला आहे, शोधून देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस”

‘भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घ्या’; रोहित पवारांची MPSCला विनंती

मोठा झटका! Quinton de Kockची अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

MARD Doctor Strike: कोरोनाचं सावट घोंगावत असताना डाॅक्टरांचा आजपासून संप

गोव्यात राडा: ‘या’ स्टार खेळाडूच्या पुतळ्यावरुन नवा वाद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More