बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपचा प्रमुख नेताच केंद्रीय तपास यंत्रणेसोबत राज्यात खेळ करतोय”

मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून पेटलेलं राजकारण थाबण्याचं नाव घेताना दिसत नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आल्यानंतर राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

माझ्यावर ईडीने कारवाई केली त्यास कोणताही आधार नाही. लक्ष्य करून त्रास दिला जात आहे. ईडीच्या अशा कारवायांमध्ये नरेंद्र मोदी किंवा अमित शहांचा थेट हात असेल असं वाटत नाही, असंही राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्र भाजपमधील काही नेते आणि ईडीचे एक-दोन अधिकारी हे करत आहेत, असा आरोप राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोकमधून केला आहे.

राजकीय विरोधकांवर कधी आणि कशी कारवाई करायची, त्या अगोदर बदनामीची मोहिम राबवायची, असे प्रकार चालू आहेत. भाजपशी संबंधित लोकांनी सोशल मीडियावर कारवाईबाबत सुतोवाच द्यायचे यामुळं पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, राऊत यांनी शाहरूख खानच्या मुलाच्या प्रकरणाचा उल्लेख करताना परत एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

मुंबईचा सलग चौथा पराभव; रोहितचा ‘हा’ हुकमी एक्का ठरतोय फेल

अमेरिकेचा यु-टर्न, भारताच्या ‘त्या’ निर्णयावर अमेरिकेनं केलं मोठं वक्तव्य

कोल्हापूरचा गडी सगळ्यावर भारी! पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

“सुरक्षेत चुक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार”

“शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जमिनी बळकावल्या म्हणून…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More