“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक”; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.

या आरोपांमुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांच्या या आरोपांनंतर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली आहे.

“जे झुकले ते भाजपात गेले, आम्ही दबावाला बळी पडलो नाही”

“समित कदम हा सद्गृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने अनिल देशमुख यांना वारंवार भेटला होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करा, प्रतिज्ञापत्रांवर सह्या करा, असं हा व्यक्ती सांगत होता. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले खलनायक आहेत हे माझं स्पष्ट मत आहेत.”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

“जे झुकले ते भाजपात गेले. मग ते अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील. अजित पवार, एकनाथ शिंदे वेश पालटून फिरत होते. मात्र, मी किंवा अनिल देशमुख हे दबावाला बळी पडले नाहीत. अनिल देशमुख यांना समित कदम भेटले होते. आता यावर फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल की आमचा काही संबंध नाही. मात्र हा त्यांचा संबंध आहे.”, असं म्हणत राऊत यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटाला देखील टार्गेट केलं.

समित कदम कोण?, त्याला वाय दर्जाची सुरक्षा का?

पुढे संजय राऊत म्हणाले की, अनिल देशमुख सांगतात ते खोटं आहे असा दावा केला जाईल त्यासाठी आम्ही अनेक पुरावे देऊ शकतो. पण अगोदर हा समित कदम कोण आहे? त्याला वाय दर्जाची सुरक्षा का दिली आहे? या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, अशी मागणीच राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

तसंच अनिल देशमुख यांच्यासोबत झालं तेच माझ्यासोबतही झालं असल्याचं राऊत म्हणाले. मी व्यंकय्या नायडूंनाही या संदर्भात पत्र लिहिलं होतं. त्यात मला धमक्या कशा येत होत्या ते मी सांगितलं. माझ्याबरोबर जे घडलं तसाच हा प्रकार आहे असं संजय राऊत म्हणाले.

News Title –  Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात झिका व्हायरसचा धोका वाढला; आणखी 9 रुग्ण आढळल्याने खळबळ

“..ते सगळं ऐश्वर्याला कधीच मान्य नव्हतं”; सलमान-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल मोठा खुलासा समोर

SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ‘इथे’ करा झटपट अर्ज

वरळीत पुन्हा हिट अँड रन; अत्तर व्यवसायिकाच्या गाडीने तरुणाला उडवले

राज्यात पावसाचा जोर ओसरला तरी धोका कायम; पुढचे 4 दिवस..