“देवेंद्रजी तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे, ही फडणवीसी राज्यात दाखवू नका”

Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून राऊत यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीसांचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे, अशा शब्दात संजय राऊतांनी (Sanjay Raut) त्यांना डिवचलं आहे.

“तुम्ही देशातील मुस्लिमांना बदनाम करत आहात. बटेंगे तो कटेंगे असे सांगत फिरत आहात. पण, तुमचं हे धोरण इथं चालणार नाही. तुम्ही शिवरायांचा गैरवापर करत आहात.फडणवीस तुमचे पूर्वज मोगलांची चाकरी करत होते आणि महाराष्ट्राशी गद्दारी करत होते. त्यामुळे ही फडणवीसी महाराष्ट्रामध्ये दाखवू नका”, अशा शब्दात संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी दिल्ली दरबारी गहाण ठेवलाय. यामुळेच ते सतत दिल्लीला जाऊन झुकत आहेत. राज्यात आमचे सरकार आले तर आम्ही शिवाजी महाराजांचं मंदिर उभारू, आमच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. आम्ही छत्रपतींचे मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारू, असं उद्धव ठाकरे सांगत आहेत. यामुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय.”, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

यावेळी राऊत यांनी शरद पवार यांनी निवृत्तीबाबत दिलेल्या संकेताबद्दल देखील भाष्य केलं. “शरद पवार हे संसदीय राजकारणातले भीष्म पितामह आहेत. विधानसभा, लोकसभा, राज्यसभा अश्या सर्व ठिकाणी ते काम करत आहेत. काही काळापासून त्यांच्या मनात निवृत्तीबाबत विचार येत आहेत. माझ्याकडे देखील त्यांनी हा विचार बोलून दाखवला होता. आम्ही त्यांना सांगितलं की, असा विचार मनात आणू नका. वय नाही अनुभव हा विषय आहे. त्यांचा प्रदीर्घ अनुभव हा समाजाला फायद्याचा ठरेल.” असं राऊत यांनी म्हटलंय.

शरद पवार काय म्हणाले होते?

“मी आत्ता राज्यसभेत आहे. अजून दीड वर्षं टर्म आहे. त्यानंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचाही विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढवणार नाही. कोणतीच निवडणूक लढवणार नाही. किती निवडणुका लढवायच्या? आत्तापर्यंत 14 निवडणुका लढवल्या. आणि तुम्ही असले लोक आहात की एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडूनच देताय. पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी आणली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय”, असं वक्तव्य करत शरद पवार(Sharad Pawar) यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले.(Sanjay Raut)

News Title :  Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील ‘या’ भागात बरसणार पाऊस; IMD चा इशारा

राहुल गांधी करणार 5 गेमचेंजर घोषणा, मविआच्या गॅरंटीत कोणते मुद्दे?

भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, ‘या’ नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी

“भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा, तितकाच दाढीवाल्यांचाही”

लाडक्या बहीणींना महिन्याला मिळणार 2100 रुपये?, मुख्यमंत्री शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा