“आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी”; वायकरांवरील गुन्हे मागे घेताच संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut | मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे आता मागे घेण्यात आले आहेत.

मात्र, वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्याने विरोधकांनी आता टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणी राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला आहे.

संजय राऊत यांचा हल्लाबोल

“आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीनचीट द्यायचे बाकी आहे. हे सरकार ओवाळून टाकलेले सर्व भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत.”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला.

“भ्रष्ट्राचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन आमची ताकद किती वाढली हे दाखवत आहेत. वायकर ईडी, सीबीआयला घाबरून पळून गेले. आता त्यांना क्लीनचीट दिली. मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारमध्ये दुसरं काय होऊ शकतं?”, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

भाजप नेत्याने वायकरांवर केले होते गंभीर आरोप

“आमच्यासारखे काही लोकं दबावाला बळी पडले नाहीत. अजित पवार पळून गेले, मुख्यमंत्री पळून गेले, त्यांना कारवाईची भीती होती. भाजपने आता मान्य करावे की, आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते.”, असंही राऊत (Sanjay Raut)  यावेळी म्हणाले.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केले होते. मविआ सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड रवींद्र वायकर यांनी लाटला होता. तसेच त्या जागी पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून तब्बल 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.या प्रकरणीच आता वायकर यांना क्लीन चीट मिळाली आहे.

News Title – Sanjay Raut criticizes state government over Ravindra Waikar Clean Chit

महत्वाच्या बातम्या-

मुंबईकरांनो ‘या’ कारणामुळे मुंबईतील ‘हे’ रस्ते 4 दिवस बंद राहणार; असा असणार पर्यायी मार्ग

मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला आजपासून सुरवात; असा असणार रॅलीचा मार्ग

पुण्यात रात्री घडला धक्कादायक प्रकार; महिला पोलिसावर पेट्रोल ओतलं..पुढं काय घडलं

ब्रेकिंग! खासदार रविंद्र वायकरांना क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

T20 वर्ल्डकपनंतर टीम इंडिया झिम्बाब्वेशी भिडणार, जाणून घ्या सामन्याची संपूर्ण माहिती