बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर भाजप पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही”

मुंबई | शरद पवार यांनी फडणवीसांना सत्तेचा कानमंत्र दिला असेल. विरोधी पक्ष अशाचप्रकारे सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत राहिला तर पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही हे पवारांनी फडणवीस यांना सांगितलं असेल, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.

शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही, असं राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पवार- फडणवीस भेटीवर भाष्य केलं.

महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांना अशाप्रकारे भेटत असतात, आपल्याकडे तशी परंपरा आहे. शरद पवार यांची तब्येत सध्या थोडीशी खराब आहे. त्यामुळे फडणवीसांनी सदिच्छा भेट दिली असेल, असं संजय राऊत म्हणाले. तसेच पाच दिवसांपूर्वी मी देखील शरद पवार यांना भेटलो होतो. त्यापूर्वी शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे अशा भेटीगाठी होत असतात. प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणं योग्य ठरणार नाही, असं राऊत म्हणाले.

शरद पवार यांनीही विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून फडणवीसांना मार्गदर्शनच मिळाले असावे, अशी टीका संजय राऊत यांनी केलीये.

थोडक्यात बातम्या- 

गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर, मात्र रेशन दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!

विवाहीत प्रियकराकडे प्रेयसीने केली लग्नाची मागणी, प्रियकराने केलं असं काही की…

दिलासादायक बातमी! देशात नव्या कोरोना रुग्णांमध्ये 25 हजारांनी घट, तर कोरोनाबळीही 2800च्या खाल

7 महिन्याच्या बाळाला आईनेच केली जबर मारहाण; कारण अत्यंत धक्कादायक

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर शरद पवारांनी बोलवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याची बैठक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More